About Academy

Commando  Academy Patgaon



           महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बेरोजगार असणारया मोठया वर्गाची मुलभूत गरज लक्षात घेऊन आणि  सर्वांना आपली गुणवत्ता सिध्द करण्याची  संधी मिळवण्याचा , यश प्राप्त करण्याचा हक्क असतो हा हक्क सर्वसामान्य तरूणांना मिळवून देण्यासाठी  आम्ही १५ ऑगस्ट २०१४ रोजी  समाजोपयोगी कमांडो  करिअर अकॅडमी, या संस्थेची स्थापना केली.

         योग्य दिशेने प्रयत्न केले, अभ्यास केला, उपलब्ध नोकरीविषयक जाहिरातींना अनुसरून अर्ज केले तर अत्यंत पारदर्शक पणे आणि सरळ मार्गाने स्वत:ला सरकारी नोकरी मिळवून स्वहित साधताना समाजाचे ऋण फेडता येते. स्वत:चे भविष्य घडविता येते हे फक्त कागदावरच लिखित नसून कमांडो करिअर अकॅडमीने नोकरीच्या शोधात असणारया बेरोजगार तरुणांच्या मनात रुजविलेला अलिखित सिध्दांत आहे.  विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळ्वून देणारया आणि त्यांचे जीवन सुखकर करणारया जीवनाला आणि करिअरला दिशा देताना उज्वल भविष्य घडविण्याचे महान कार्य कमांडो  करिअर अकॅडमी करत  आहे. 
         नोकरीच्या शोधत असणाऱ्या सुरक्षित बेरोजगाराच्या एजंटाकडून मोठ्या प्रमानात फसवणूक होत आहे. ग्रामीण भागात एजेटांचा सुळसुळाट ज़ालेला आहे. गोरगरीब जनतेला मोठमोठी अस्वसने  देऊन १०० % नोकरीची हमी देऊन फसवण्याची संख्या दिवसेनेदिवस वाढत चाललेली  आहे. सवकारी व्याजाने रककम काढून एजेटची घरे भरली जात  आहे.  गोरगरीब  जनता मात्र दरिद्रच्या खाईत लोटली जात आहे भरतीसाठी पैसा लागतो या गोस्टीवरून  ऐजंट विद्याथी / पालकाची फसवणूक करून  स्वताचा मोठे बनले आहेत .  गरीब विद्याथी / पालकाची फसवणूक होऊ  नये यासाठी N.S.G  कमांडो मारुती शिंदे ( सर ) यांच्या